बातम्या

सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना का झापलं... ?

Why did the Supreme Court arrest Rahul Narvekar


By nisha patil - 10/13/2023 5:00:49 PM
Share This News:



 सर्वोच्च न्यायालयात  आज विधानसभा अध्यक्षांच्या  दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी  किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

 सर्वोच्च न्यायालयात  आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना  सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीशांनी   चांगलंच सुनावलं.
  तुम्ही  पोरखेळ करताय का?  विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, अशा कडक  शब्दात सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना   सुनावलं .
       सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही धारेवर धरलं .तसेच, अपात्रता प्रकरणावरील  वेळापत्रकचेही   ताशेरे ओढले आहेत. 
    सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा भाग आहे, त्यामुळेच आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही आहोत, पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावंच लागेल, . जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आलं नाही, तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेतच अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल, असे आदेश त्यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.


सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना का झापलं... ?