बातम्या
भात आणि चपाती एकत्र न खाण्याचा सल्ला का देतात एक्सपर्ट? जाणून घ्या कारण...
By nisha patil - 1/22/2024 7:24:49 AM
Share This News:
भारतात जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात. पण डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामागे कारणही तसंच आहे.
चला जाणून घेऊ याबाबत असं का सांगितलं जातं.
भात-चपाती एकत्र खावी की नाही?
द हेल्थ साइट डॉट कॉमने एका वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये? असा प्रश्न विचारला गेल्यावर याचा थेट संबंध कॅलरी वाढण्याशी आहे. कारण जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी घेत असता. जेव्हा तुम्ही अधिक कॅलरी असलेला आहार घेता तेव्हा पचन तंत्रांवर अधिक जोर पडतो.
भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यानेच पुढे लठ्ठपणाची समस्या होते. तुम्हीही असंच करत असाल आणि पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पद्धत वेळीच बंद करा. काही रिसर्चमधूनही ही बाब समोर आली की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.
रात्री काय खावं?
डाएट एक्सपर्ट्सही सांगतात की, भाताच्या तुलनेत चपाती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.
रात्री भात खावा की नाही?
भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
भात आणि चपाती एकत्र न खाण्याचा सल्ला का देतात एक्सपर्ट? जाणून घ्या कारण...
|