बातम्या
पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांना मतदार यादीत बोगस नावे का घुसडावी लागतात? समरजितसिंह घाटगे
By nisha patil - 10/26/2024 10:14:06 PM
Share This News:
कागल,प्रतिनिधी. पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांना कागल शहरात बोगस मतदारांची नावे का घुसडावी लागतात?असा सवाल कागल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केला.
लिंगनूर दुमाला (ता.कागल)येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जयदीप जाधव होते.
कागल तालुक्याला उच्च विद्या विभूषित , व तळमळीने विधायक काम करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांचा वारसा चालवणाऱ्या राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे या उद्देशाने माजी सरपंच वंदना बागडी,सुनिल बागडी,अनिल बागडी, इंदुबाई बागडी, गीतांजली बागडी, प्रकाश बागडी, शुक्राचार्य बागडी, दिनकर बागडी, अर्चनाबागडी, लक्ष्मीबाई बागडी यांनी मुश्रीफ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांचे समरजितसिंह घाटगे यांनी स्वागत केले.
घाटगे पुढे म्हणाले,कागल शहरातील यादीत पाचशेहून अधिक नवीन नावे ऑनलाईन ट्रान्सफर ॲप.फॉर्म नंबर आठ द्वारे नोंदलेली आहेत.ही कागल तालुक्यातील नसून परजिल्ह्यातील आहेत.या नावांची रीतसर शहानिशा बी.एल.ओ.मार्फत करण्याची आवश्यकता आहे.वास्तविक नवीन आलेल्या नावांची यादी सात दिवसांच्या आत प्रसिद्ध व्हावयास हवी होती.मात्र अद्यापही ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य केले. त्यांच्या जनक घराण्याचे वंशज असलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचा वारसा आचार,विचार व प्रत्यक्ष कृतीतून चालविला आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून देऊन शाहूंच्या या वंशजांचा सन्मान करूया.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर,भिमराव मगदूम,किरण तोडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाहूचे संचालक युवराज पाटील,सतीश पाटील,राजेंद्र जाधव,शिवानंद माळी,संभाजीराव भोकरे,अरुण व्हरांबळे,अतुल खद्रे,सुधाकर सुळकुडे,राहूल पाटील,राज कांबळे,संजय लोंढे,बाळू शिरोळे,आनंदा व्हन्नूरे शहाजी पाटील, काशिनाथ तोडकर,भुपाल कांबळे,रत्नाप्पा कुंभार,दीपक भोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल कुंभार यांनी स्वागत केले.उदय तोडकर यांनी आभार मानले.
... चुकीच्या मतदान नोंदणी बाबत संबधित अधिकाऱ्यांनी
शहानिशा करून निर्णय घ्यावा
यावेळी घाटगे पुढे म्हणाले,मतदार यादीतील संशयास्पद नावांबाबत तहसिलदार,कार्यालयाकडून,एकतर्फी कारवाई होऊ नये. चुकीच्या पध्दतीने नोंदणीसाठी आलेली असतील तर त्यास स्थगिती द्यावी.अशी मागणी आमच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.यापैकी एक-दोन नावाची शहानिशा आमच्या कार्यकर्त्यांनी केली असून ती अमरावती जिल्ह्यातील आहेत. हे निदर्शनास आले.त्यामुळे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांना मतदार यादीत बोगस नावे का घुसडावी लागतात? समरजितसिंह घाटगे
|