बातम्या

राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या मागे का जायचं ?

Why go after nationalists self respect


By nisha patil - 4/6/2023 8:14:01 AM
Share This News:



 इचलकरंजी : प्रतिनिधी nराष्ट्रवादीने विधानसभेला आघाडी धर्म पाळला नाही तर स्वाभिमानीने आवाडेंचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या मागे जाण्याची आमची अजिबात मानसिकता नाही. त्यांच्या सोयीसाठी आमचा बळी का देता?  अशी परखड भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी मुंबईतील बैठकीत मांडली.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर, हातकणंगले दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवावेत, अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून आमदार सतेज पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते.
दरम्यान ,
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची दमदार कामगिरी सुरू आहे. भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती ही महत्त्वाची सत्ता केंद्र काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आमदार पाटील यांनी जिल्हा भाजप मुक्त केला आहे. याकडे बावचकर यांनी बैठकीचे लक्ष वेधले. इतरांच्या सोयीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान करू नका , अशी विनंती त्यांनी  केली.


राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या मागे का जायचं ?