दहावीच्या निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल

Why has the percentage of 10th result fallen Konkan tops in the state


By nisha patil - 2/6/2023 9:00:55 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट झाली आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाची घोषणा केली. यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 92.05 टक्के इतका लागला आहे.मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 151 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले असून, 66 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, 1 लाख 9 हजार 344 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत.यंदा दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 3.11 टक्क्यांनी घटला आहे. मार्च २०२० च्या निकालाशी तुलना केल्यास यंदाचा निकाल 1.47 टक्क्यांनी कमी लागला आहे.
राज्याचा निकालाचा टक्का घसरण्याचं कारण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेतली गेली नाही. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला होता.यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नेहमीप्रमाणे लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक शाळेवर परीक्षा केंद्र, अर्धा तास अधिक वेळ, 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.दहावी परीक्षेवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला होता, तरी परिस्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे दहावीच्या परीक्षेचे आयोजन करणे शक्य झाले. पुढील परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आणि पारंपरिक पद्धतीनेच आयोजित करण्यात येईल”, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी – 15 लाख 41 हजार 666
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 15 लाख 29 हजार 96
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – 14 लाख 34 हजार 898


दहावीच्या निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल