बातम्या
पावसाळ्यात दही का खाऊ नये बरं ?
By nisha patil - 4/7/2023 7:11:28 AM
Share This News:
पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. गारवा घेऊन येणारा हा ऋतू त्याच्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याचा धोकाही असतो. म्हणूनच या काळात आरोग्याची, तसेच खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणे गरजे असते. हेल्दी लाईफस्टाइल फॉलो केली पाहिजे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. त्यामध्ये दह्याचा देखील समावेश असतो.आयुर्वेदानुसार पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दही खाऊ नये. ते खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. पण या ऋतूत दही का खाऊ नये, हे तुम्हाला माहीत आहे का ? या ऋतूत दही खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते ? याबाबत तज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दही खाल्ल्याने त्वचेवर फोड येणे, पिंपल्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्याही सुरू होऊ शकते. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे. तसेच पावसाळ्यात ऋतूत दही खाल्ल्याने फंगल इन्फेक्शनची समस्याही वाढते. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात.
पावसाळ्यात दही का खाऊ नये बरं ?
|