बातम्या
घरात का लावतात तुळशीचे रोप? जाणून घ्या त्याचं धार्मिक महत्त्व
By nisha patil - 1/18/2024 7:46:52 AM
Share This News:
आयुर्वेद आणि शास्त्र यांमध्ये तुळशीचे रोप घरात लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये तुळशीच्या रोपांना पूजनीय, पवित्र आणि देवीचा दर्जा दिला गेला आहे. याच कारणाने हिंदू धर्मानुसार घराघरात तुळशीचे रोप पाहिला मिळते. तुळशीचे रोप धार्मिक आणि वैज्ञानिक या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
तुळशीचे रोपाचे धार्मिक महत्त्व काय ?
– हिंदू धर्मात मान्यता आहे की, तुळशीविना भगवान श्री हरी आणि श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण राहते. याशिवाय तुळशीचे भोग हनुमानजींना लावले जाते.
– सनातन धर्मात अशी मान्यता आहे की, तुळशीच्या पानांना गंगाजलसह मृत व्यक्तिच्या तोंडात ठेवल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याला स्वर्ग मिळतो.
– तुळस आणि गंगाजलच्या पूजेत कधीही शिळी मानली जात नाही. या दोन्हीही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत शिळी किंवा अपवित्र मानल्या जात नाहीत.
– तुळशीचे रोप अंगणात लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने माणसाच्या मागील जन्मातील सर्व पापे धुवून निघतात, असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे.
– जर तुळशीची पूजा दररोज नियमितपणे केली जात असेल तर घरात यमदूत कधीही येत नाही. याशिवाय सुख आणि समृद्धी घरात राहते.
– तुळशीच्या रोपाचे महत्त्व संपूर्ण हिंदू ग्रंथ आणि शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तुळशीच्या रोपाचे अनेक गुण पद्मपुराण, ब्रह्मवैवर्त, स्कंद पुराण, भविष्य पुराण आणि गुरुड पुराणात सांगितले आहे.
घरात का लावतात तुळशीचे रोप? जाणून घ्या त्याचं धार्मिक महत्त्व
|