बातम्या

रामरक्षा स्तोत्र कां म्हणावे...

Why should Ramraksha Stotra be recited


By nisha patil - 1/24/2024 7:36:54 AM
Share This News:



राम राम चा उच्चार केल्यावर शरीरात होणारे बदल, शास्त्रीय द्रुष्टीने सांगितले आहेत. मला समज नव्हती तेव्हा पासून माझे दोन्ही आजोबा, काका, मामा एकमेकाना रामराम घालायचे...
 
रामराम खूपदा हा शब्द ऐकला होता पण अर्थ समजला नव्हता. एके दिवशी रामरक्षा स्तोत्र का म्हणावे. बिकट स्थिती असताना आवर्जून का म्हणावे या बाबत अर्थ समजला रामरक्षा स्तोत्र म्हणतात इतक्या वेळेस राम शब्द का येतो...?
 
१) 'र' अक्षाराचा उच्चार करताना आपल्या नाभी म्हणजे बेंबी जवळील भाग आतमध्ये ओढला जातो. तो आत जातो तेव्हा आपले मणिपूर चक्र कार्यान्वित होते. हे चक्र नाभिस्थाना जवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.

 

 
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो. 
 
३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
 
४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा किंवा एकाग्रता.
 
५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय.
 
६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात.
 
७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.


रामरक्षा स्तोत्र कां म्हणावे...