बातम्या
त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे..? - देवेंद्र फडणवीस
By nisha patil - 10/20/2023 4:15:37 PM
Share This News:
त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे..? - देवेंद्र फडणवीस
कंत्राटी भरतीचा जीआर आता रद्द...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
कंत्राटी भरतीचा जीआर आता रद्द करण्यात आले आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.
शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत त्यांना चांगलच धारेवर धरले आहे. कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेत केली .
त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे..? - देवेंद्र फडणवीस
|