बातम्या

का केल सासऱ्याने सुनेचं मुंडकंच धडावेगळं

Why should the father in law shave the head of the daughter inlaw


By nisha patil - 6/28/2023 7:01:27 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम मलिकपुर गावचे रहिवासी रघुवीर सिंह त्यांच्या दोन सुना आणि छोट्या मुलासोबत राहतात. रघुवीर यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर छोटा मुलगा गौरव हा फर्रुखाबादमध्ये पोलिस कॉस्टेबल या पदावर कार्यरत आहे. रघुवीर मंगळवारी घरी आले त्यावेळी त्यांची लहान सुन प्रियंका जेवण बनवत होती. या दरम्यान रघुवीर आणि सुन प्रियंका यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. याच वादातून संतप्त होत रघुवीर यांनी कुऱ्हाडीने सुनेवर वार करून तिची हत्या केली. या दरम्यान प्रियंकाला वाचवायला रघुवीर यांची मोठी सुन देखील आली होती, मात्र ती देखील गंभीर जखमी झाली होती.या घटनेनंतर आरोपी रघुवीर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह घराच्या दरवाज्यावर बसला आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना घटनेची माहिती देऊ लागला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यासोबतच प्रियंकाच्या कुटुंबियांना देखील कळवले होते. प्रियंकाच्या हत्येची मिळताच तिच्या कुटुबियांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह दिला. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच प्रियंकाच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी रघुवीरला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोनम कुमार यांनी दिली आहे. या घटनेत एका सासऱ्याने कौटुबिक वादातून सुनेवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुनेला वाचवायला गेलेली मोठी सुन देखील गंभीर जखमी झाली आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.


का केल सासऱ्याने सुनेचं मुंडकंच धडावेगळं