विशेष बातम्या
काही लोकांना का पचत नाही दूध ? जाणून घ्या कारण
By nisha patil - 6/22/2023 8:23:47 AM
Share This News:
काही लोकांची इच्छा असूनही त्यांना दूध पीता येत नाही कारण त्यांना Lactose Intolerance चा त्रास असतो. याचाच अर्थ, त्यांन दूध ( milk ) नीट पचत नाही.
दूध
प्यायल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. दुधामध्ये लॅक्टोज (lactose) नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते व त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते व शरीराला शक्ती मिळते. या प्रकारची साखर केवळ दुधामध्येच आढळते.
का पचत नाही दूध ?
दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते जे लहान आतड्यात तयार होते. वयाच्या 2 वर्षांपर्यंत, हे एन्झाइम भरपूर प्रमाणात तयार होते. मात्र त्यानंतर त्याच्या निर्मितीची प्रक्रिया हळूहळू कमी होत जाते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही व ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते. यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय भाषेत याला Lactose Intolerance म्हणजेच लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतात.
दूध न पचण्याचे कारण
– लॅक्टोज इनटॉलरन्सची ही समस्या बहुतेक अनुवांशिक असते. म्हणजेच तुमच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला हा त्रास असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो.
– लहान आतड्यात काही दोष असेल तर लॅक्टोज तयार न झाल्यामुळे दूध पचू शकत नाही.
– काही रोग किंवा संसर्गामुळे, आतड्यांमध्ये लॅक्टोज तयार न झाल्यामुळे दूध पचत नाही.
दूध न पचण्याची लक्षणे
– दूध न पचल्यामुळे, दूध प्यायल्यानंतर काही वेळातच पोट फुगणे, पोटदुखी किंवा गोळा येणे, अस्वस्छ वाटणे, जुलाब होणे यासारखा त्रास होतो. शरीरात किती लॅक्टोज तयार होत आहे यावरही ते अवलंबून असते.
– दूध पचत नसेल तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
काही लोकांना का पचत नाही दूध ? जाणून घ्या कारण
|