बातम्या

मानसिक आरोग्याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक..... डॉ. दीपक भोसले

Widespread awareness about mental health is needed  Dr Deepak Bhosale


By nisha patil - 10/10/2023 7:54:34 PM
Share This News:



मानसिक आरोग्याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक.....  डॉ. दीपक भोसले

दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग, सायबर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमीत पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी बोलताना समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की यावर्षी  मानसिक आरोग्य हा मुलभूत अधिकारात समावेश केला जावा हे घोषवाक्य असून या अनुषंगाने सर्व स्तरावर सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे नमूद केले.दिवसेंदिवस  समाजात, मानसिक आरोग्याबाबत सर्व स्तरावर अनास्था दिसून येत असून, वास्तविक पहाता शालेय स्तरापासून या विषयाची जनजागृती होणे कमप्राप्त असल्याचे सांगितले. समाजात विविध सामाजिक संस्था, वैद्यकिय चिकित्सक व प्रशिक्षीत समुपदेशक कार्यरत असून त्यांच्या सेवेचा उपयोग करून घेणे अपेक्षीत असून त्यामुळे मानसिक आरोग्यामुळे उदभवू पाहणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालता येऊ शकेल. प्रारंभी कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. कालिंदी रानभरे यांनी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण 30 हूनअधिक पोस्टर तयार केले असून येणाऱ्या काळात विविध ठिकाणी या पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास सोलापूर विद्यापीठाचे डॉ.अभय जाधव, डॉ.संदीप जगदाळे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. अमर निर्मळे, मौनी विद्यापीठातील प्रा. श्रीकांत देसाई, समाजकार्य विभागातील डॉ. एस. पी. राजपूत, डॉ. एस. एस. आपटे, डॉ. डी.एन. वळवी, प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर व समाजकार्य विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मानसिक आरोग्याबाबत व्यापक जनजागृती आवश्यक..... डॉ. दीपक भोसले