बातम्या

अखेरच्या कसोटीतून केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर संघाबाहेर पडणार...?

Will KL Rahul Washington Sundar be out of the final Test


By nisha patil - 2/29/2024 7:53:24 PM
Share This News:



मुंबई ।  इंग्लंडविरोधात होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयकडून महत्वाची महिती दिली आहे. केएल राहुल  अखेरच्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. तर जसप्रीत बुमराह  याचं कमबॅक झालेय. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर यालाही रिलिज कऱण्यात आले आहे. बीसीसीआयनं अधिकृत परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली. बीसीसीआयकडून मोहम्मद शामी याच्या सर्जरीबद्दलही माहिती देण्यात आली आहे. 

केएल राहुल अखेरच्या सामन्यातून बाहेर - 

अनुभवी फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे अखेरच्या सामन्याला मुकणार आहे. हैदराबाद कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला आराम देण्यात आला. दुखापतीमधून सावरल्यानंतर त्याला 15 जणांच्या चमूमध्ये त्याला स्थान देण्यात आले, पण फिटनेस सिद्ध करु न शकल्यामुळे त्याला बाहेर खेळवण्यात आले नाही. तो पाचव्या सामन्यात कमबॅक करेल, असा अंदाज होता. पण त्याच्या फिटनेसमध्ये कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल उपचारासाठी लंडनला रवाना झालाय. तो दोन आठवड्यापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची शक्यता नाही


अखेरच्या कसोटीतून केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर संघाबाहेर पडणार...?