बातम्या

पांड्या जडेजा वर्ल्ड कपवारीला मुकणार?

Will Pandya Jadeja miss the World Cup


By nisha patil - 4/25/2024 5:18:39 PM
Share This News:



आयपीएल (IPL 2024) संपल्यानंतर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप  स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी गट अ मध्ये आहे. या गटात पाकिस्तान देखील आहे. आयसीसीच्या नियमानुसार 1 मे पूर्वी टीम इंडियाची घोषणा करावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी वेळ मिळणार नसल्यानं आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील कामगिरीचा निकष लावल्यास हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनीचा पठ्ठ्या या दोघांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे.  चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराऊंडर शिवम दुबे याला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळू शकतं. शिवम दुबे आयपीएल  चांगली कामगिरी करतोय. टीम इंडियाचा  प्रमुख ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोघांची कामगिरी चांगली झालेली नाही. दोघांचा ही फॉर्म खराब झालेली आहे. जडेजानं हार्दिक पांड्याच्या तुलनेत समाधानक कामगिरी केलेली आहे. हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं शिवम दुबे टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. 

रवींद्र जडेजानं देखील यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानं केवळ एक अर्धशतक केलं आहे. त्याला इतर डावांमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रवींद्र जडेजानं 8 मॅचमध्ये केवळ 4 विकेट घेतल्या आहेत.  दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपसाठी 1 मे पूर्वी भारतीय संघ जाहीर करावा लागणार आहे. 


पांड्या जडेजा वर्ल्ड कपवारीला मुकणार?