बातम्या

विजय वडेट्टीवार हिंगोलीच्या ओबीसी सभेला उपस्थित राहणार ? म्हणाले....

Will Vijay Vadettiwar attend Hingoli s OBC meeting Said


By nisha patil - 11/25/2023 4:44:39 PM
Share This News:



 गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, त्यामुळे, उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते 

मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे, भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारयांनी घेतली होती. दरम्यान, आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे, उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.


विजय वडेट्टीवार हिंगोलीच्या ओबीसी सभेला उपस्थित राहणार ? म्हणाले....