बातम्या

लोकसभेची निवडणूक लढविणार...! दोन दिवसांत भुमिका स्पष्ट करणार - चेतन नरके

Will contest the Lok Sabha elections


By nisha patil - 3/18/2024 5:00:38 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: प्रतिनिधी महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाची उमेदवारी मिळणारच असे गृहित धरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संपर्क दौऱ्यांची मोहीम गतिमान केली होती.आघाडीच्या पण फॉर्म्युल्यानुसारकोल्हापूरची जागा काँग्रेसला दिलीअसून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मला
 

उमेदवारी मिळणार नसली तरी मी निवडणूक लढविणारच असून येत्या दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माध्यमांशी
बोलतानागोकुळचेसंचालकचेतन नरके म्हणाले स्पर्धा परीक्षादेणाऱ्या हजारो युवकांना सुशिक्षित
बेकारांना मार्गदर्शन केले आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जाणे आवश्यक आहे. त्यासाठीच गेल्या दोन वर्षांपासून जनतेच्या संपर्कात आहे.संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून त्यांच्याअडीअडचणी जाणून घेत आहे. पण पक्षीय राजकारणातील अडथळ्यामुळे मला उमेदवारी मिळणार नसली तरीही मी जनतेच्या हितासाठी निवडणूक लढविणारच आहे. त्याबाबत येत्या दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे नरके यांनी स्पष्ट केले.


लोकसभेची निवडणूक लढविणार...! दोन दिवसांत भुमिका स्पष्ट करणार - चेतन नरके