विशेष बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लढा तीव्र करणार - राजू शेट्टी 

Will intensify the fight by uniting the farmers of the state


By nisha patil - 7/3/2025 3:47:51 PM
Share This News:



राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लढा तीव्र करणार - राजू शेट्टी 

राज्य सरकारच्यावतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय शेतक-यांना भुमिहीन करून सामान्य जनतेलाही देशोधडीला लावणार आहे.

त्यामुळे मुंबई येथील विधानभवनावर १२ मार्च रोजी होणा-या  शक्तीपीठ विरोधी मोर्चास राज्यातून हजारोच्या संख्येने शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले. 12 मार्च च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस गिरीष फोंडे , सम्राट मोरे , अजित पोवार , डॅा. बाळासाहेब पाटील , मायकल बारदेस्कर , शिवाजी कांबळे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.


राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून लढा तीव्र करणार - राजू शेट्टी 
Total Views: 27