बातम्या

लोकसभा निवडणूक लढवणार नाही’ : आ. विनय कोरे यांचे स्पष्टीकरण

Will not contest Lok Sabha elections


By nisha patil - 12/3/2024 7:31:38 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर – प्रतिनिधी  शिंदे गटाचे  हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात  लोकांमध्ये नाराजी असल्याचा भाजपचा अहवाल समोर आलाय. त्यामुळे त्या ठिकाणचा उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु झाल्यात. त्या ठिकाणी जर विनय कोरे यांना उतरवलं तर ते राजू शेट्टी यांच्या विरोधात जिंकू शकतात असं भाजपने  अहवालात म्हटलंय. यावर आ. विनय कोरे यांनी,   “आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील”असल्याचं जनसुराज्य संवाद कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केलय.

लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून केली जाणार नाही, मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.


लोकसभा निवडणूक लढवणार नाही’ : आ. विनय कोरे यांचे स्पष्टीकरण