बातम्या

जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार?

Will politics in the district take a different turn


By nisha patil - 9/3/2024 9:35:18 PM
Share This News:



कोल्हापूर चे राजकारण गेल्या काही वर्षांपासून बंटी ,मुश्रीफ यांच्या शब्दांत चालायचे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या भूकंपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली... गेली दोन तप जिल्ह्याचे नेतृत्व केलेल्या मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील या जोडीने सबंध जिल्ह्यात सहकारात मुसद्देगिरी दाखवत जिल्ह्यातील अनेक संस्था आणि साखर कारखाने आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी गट्टी केली  होती. मात्र राज्यातील भूकंपाचे धक्यामुळे राजकीय समीकरणे बदलून
 

मंत्री मुश्रीफ महायुतीचा घटक झाले तर  सतेज पाटील महाविकास आघाडीचे नेते म्हणून नेतृत्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ असलेल्या गडहिंग्लज येथे जनता दलाचे नेते दिवंगत श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची आमदार पाटील यांनी भेट घेतल्यानंतर, मुश्रीफ आणि पाटील यांच्य मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातय. कितीही राजकीय विरोध झाला तरी एकमेकांवर टीका न करणारे मंत्री मुश्रीफ आणि पाटील आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आपल्या मतदारसंघात आमदार पाटील जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा राग म्हणूनच आज मंत्री मुश्रीफ  सतेज पाटील यांना लक्ष्य केल्याचं बोललं जातय.दोघेही काहीही झाले तरी आपल्या उमेदवाला विजयी करण्यासाठी झुंज देत आहेत..


जिल्ह्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाणार?