बातम्या

मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात काळे झेंडे दाखवणार: मनसे

Will show black flags to Chief Minister in Kolhapur


By nisha patil - 2/15/2024 5:38:23 PM
Share This News:



मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात काळे झेंडे दाखवणार: मनसे

शेतकऱ्यांच्या अनुदावर सही मगच कोल्हापूरात या

दिलेले आश्वासन पाळले नसल्याने मनसे आक्रमक : राजू दिंडोर्ले

प्रतिनिधी  पांडुरंग फिरींगे कोल्हापुरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक  झाले असून मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन  पर अनुदानावर सही करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात प्रवेश करू नये अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचा मनसेचा इशारा. 
 

मुख्यमंत्री दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन होत असून मनसेच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळण्यासाठी  मनसे सहायक निबंधक ऑफिसच्या समोर सात दिवस आमरण उपोषण केले होते .
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सचिव राजेश कुमार यांनी लेखी आश्वासन दिले होते. यामुळे मनसेने आंदोलन मागे घेतले होते. ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल असे सांगितले होते पण अद्याप अनुदान न आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्यामुळे यावेळी मनसे आक्रमक झाली असून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येऊ नये. यायचं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना   देणार्या   अनुदानावर सही करुन यावे यावे अन्यथा त्यांना कोल्हापुरात प्रवेश नाही. तसेच काळे झेंडे दाखवण्यात येत असल्याचे जिल्हा अध्यक्ष  राजू दिंडोर्ले यांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात काळे झेंडे दाखवणार: मनसे