बातम्या

जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

Will the problem of space allocation be resolved


By nisha patil - 1/25/2024 12:29:11 PM
Share This News:



जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. 

जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक!  मुंबईत आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. 

महाविकास आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. मुंबईमधील  ट्रायडेंट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. 

आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. कोणता पक्ष किती आणि कोणती जागा लढवणार? याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.


जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक!