बातम्या

विवेकानंद मध्ये विल्यम शेक्सपियर जयंती निमित्त कार्यक्रम

William Shakespeare Birth Anniversary Program in Vivekananda


By nisha patil - 4/27/2024 6:37:58 PM
Share This News:



कोल्हापूर दि. 27 :  दिनांक २७ एप्रिल 202४ रोजी विवेकानंद कॉलेजच्या कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे प्रसिद्ध  नाटककार व कवि विल्यम शेक्सपियर यांच्या जयंती निमित्त 'ए ट्रिब्यूट टू विल्यम शेक्सपियर ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्राचार्य मा.  डॉ. आर. आर. कुंभार यांनी भूषविले. या कार्यक्रमात कला व वाणिज्य महाविद्यालयातील रितेश प्रजापती, मुस्कान मुल्ला, करण पाटील, समृद्धी कुलकर्णी, रश्मिता गौडा, साक्षी बगाडे, राजश्री शितोळे, वैष्णवी पवार या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापिका सौ. शिल्पा भोसले, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ.उज्वला हिरकुडे, सौ. अश्विनी गायकवाड माने, सौ. माधवी देशपांडे तसेच सर्व सहकारी प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.


विवेकानंद मध्ये विल्यम शेक्सपियर जयंती निमित्त कार्यक्रम