बातम्या

आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते जाहीर

Winners of Inter Bharti Chessmaster School Chess Tournament announced


By nisha patil - 1/27/2025 9:34:35 PM
Share This News:



आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते जाहीर

कोल्हापूर येथील कोरगावकर लॉन्स, टाकाळा येथे आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. दहा वर्षाखालील गटात दिविज कात्रुट (शांतिनिकेतन स्कूल) ने सात पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले, तर अवनीश जितकर (पी आर मुंडरगी इंग्लिश स्कूल) ने सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले. अथर्वराज ढोले (पोदार इंटरनॅशनल स्कूल) सहा गुणांसह तृतीय स्थानी ठरले.

सोळा वर्षाखालील गटात विवान सोनी (पोदार इंटरनॅशनल स्कूल) ने साडेसहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले, तर अभय भोसले (ज्ञानगंगा हायस्कूल) उपविजेते ठरले. तृतीय स्थानावर अर्णव र्हाटवळ (विमला गोयंका स्कूल) ठरले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचे आयोजन जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम आणि आंतरभारती चेसमास्टर चषक प्रदान करण्यात आले.


आंतरभारती चेसमास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते जाहीर
Total Views: 40