बातम्या

विठुनामाच्या गजराने अवघी वस्त्रनगरी दुमदुमली!

With the alarm of Vithunam only Vastranagari shook


By nisha patil - 9/30/2024 11:40:59 AM
Share This News:



इचलकरंजीत १०,००० हून अधिक महिलांच्या उपस्थितीत हरिपाठ जागर आणि भव्य दिंडी सोहळा संपन्न झाला. ज्ञानेश्वरी शुध्दीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार समाजात पोहचवण्याची व व्यसनमुक्त, सृजनशील विचारांची समाज निर्माण करण्याची संकल्पना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची होती. यासाठी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळ व श्री काळा मारुती महिला भक्त मंडळ यांच्या सहकार्याने हा भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. श्री विठ्ठल पाटील (काकाजी), इचलकरंजी वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य सदाशिव उपासे महाराज, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे, मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व सौ. वैशालीताई आवाडे वहिनी, सौ. मोश्मी आवाडे वहिनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. टाळ व मृदंगाच्या गजरात माऊलींचा जयघोष करत हा सोहळा पार पडला.

या दिंडीमध्ये १०,००० हून अधिक महिलांसह हजारो पताका, १५१ पखवाज व संतांच्या वेशभूषेतील लहान चिमुकले यांच्यासह शहरातील विविध दिंड्या सहभागी झाल्या. दिंडीची सुरवात के.ए.टी.पी. मैदानावर झाली, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्री शिवतीर्थ, जनता चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदर बाग, घोरपडे नाट्यगृह येथे संपन्न झाली.

भक्तिमहोत्सवाच्या वातावरणात विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने संपूर्ण वस्त्रनगरी भक्तीमय झाली. यावेळी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळाचे सदस्य, महिला भक्त मंडळाच्या सदस्या, आवाडे परिवार आणि हजारो वारकरी उपस्थित होते. या दिवशी संतांची शिकवण आणि भक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनात ठसा सोडण्यास यशस्वी ठरला.

यावेळी श्री काळा मारुती मंदिर आरती भक्त मंडळाचे सदस्य, श्री काळा मारुती महिला भक्त मंडळ सदस्या, आवाडे परिवार, प्रमुख पदाधिकारी, महिला यांच्यासह हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित होते.


विठुनामाच्या गजराने अवघी वस्त्रनगरी दुमदुमली!