बातम्या

मिरज शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू

Woman died during treatment in Miraj Government Hospital


By nisha patil - 2/7/2024 7:45:09 PM
Share This News:



प्रिया सोमनाथ जाधव वय वर्ष 32 राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी मिरज या मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे aनातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत आज मिरज शासकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते  अचानक उलटी व जुलाब सुरू झालेल्या  प्रिया जाधव यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी  दाखल केले होते  प्रकृती चिंताजनक  झाल्या नंतर अवघ्या  16 तासाच्या आत त्याचा मृत्यू झाला यास जबाबदार कोण जे डॉक्टर किंवा सिस्टर जो कोणी संबंधित स्टाफ   असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी संतोष शिवाजी जाधव यांनी दिला आहे. संतोष शिवाजी जाधव  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंदा रजपुत तसेच नातेवाइकांनी अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव वैद्यकीय अधिक्षक डॉ रुपेश शिंदे  यांची भेट घेतली शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निष्पक्ष कारवाई करण्याचे आश्वासन अधिष्ठता डॉ प्रकाश गुरव यांनी दिले आहे


मिरज शासकीय रुग्णालयात महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू