बातम्या

महिला असुरक्षितच!, बलात्कार, अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ; कोल्हापूर परिक्षेत्रातील आकडेवारीवरून स्पष्ट

Women are not safe increase in rape


By nisha patil - 2/21/2024 5:41:02 PM
Share This News:



प्रतिनिधी  पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध उपाययोजना आणि त्याचा गाजावाजा सुरू असला, तरी प्रत्यक्षात मात्र महिला असुरक्षितच असल्याचे चित्र गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात महिलांशी संबंधित असलेले पाच हजार ८०८ गंभीर गुन्हे नोंद झाले. यात ७५ महिलांचा खून झाला असून, ११२७ महिला बलात्काराची शिकार बनल्या. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात, त्यांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी, घरात आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडूनही निर्भया पथक, महिला दक्षता पथक, दामिनी पथक असे अनेक उपक्रम राबवले जातात. यानंतरही महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या वाढतच आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात महिलांशी संबंधित असलेल्या पाच हजार ८०८ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचारात सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्हे पुढे आहेत. सातारा आणि सांगली जिल्ह्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांची संख्या काहीशी कमी आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये महिलांचे खून, खुनाचे प्रयत्न आणि अपहरणाच्या गुन्ह्यात घट झाली. मात्र, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली.

विनयभंग वाढले

गेल्या वर्षभरात २०२२ च्या तुलनेत विनयभंगाचे २४६ गुन्हे वाढले. बाललैंगिक अत्याचाराचे ४९, तर बलात्काराचे ९४ गुन्हे वाढले. अपहरणाचे १५५ गुन्हे घटले. खून आणि खुनाच्या गुन्ह्यातही किंचित घट झाली.

महिलांचे खून – ७५

जिल्हा – दाखल – उघड
कोल्हापूर – १२ – १२
सांगली – १३ – १३
सातारा – ११ – ६
सोलापूर ग्रामीण – २४ – २२
पुणे ग्रामीण – १५ – १२

बलात्कार – ११२७

जिल्हा – दाखल – उघड
कोल्हापूर – १९८ – १९८
सांगली – १६५ – १६४
सातारा – १७० – १४१
सोलापूर ग्रामीण – २६७ – २६४
पुणे ग्रामीण – ३२७ – ३२७

बाललैंगिक अत्याचार – ७३६

जिल्हा – दाखल – उघड
कोल्हापूर – १३६ – १३६
सांगली – १०६ – १०५
सातारा – १२२ – १०३
सोलापूर ग्रामीण – १७६ – १७४
पुणे ग्रामीण – १९६ – १९६

विनयभंग – २४४६

जिल्हा – दाखल – उघड
कोल्हापूर – ४४० – ४३७
सांगली – ३१४ – ३१०
सातारा – ३७६ – २४८
सोलापूर ग्रामीण – ५३६ – ५३३
पुणे ग्रामीण – ७८० – ७७६

अपहरण – १३५५

जिल्हा – दाखल – उघड
कोल्हापूर – १९६ – १६६
सांगली – २३० – ११३
सातारा – २२२ – १४०
सोलापूर ग्रामीण – २४५ – २०७
पुणे ग्रामीण – ४६२ – ३२६


महिला असुरक्षितच!, बलात्कार, अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ; कोल्हापूर परिक्षेत्रातील आकडेवारीवरून स्पष्ट