विशेष बातम्या

महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे जीवन घडवले पाहिजे : आरती काणिरे

Women should build their own lives based on their own courage


By nisha patil - 3/17/2025 8:13:47 PM
Share This News:



महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे जीवन घडवले पाहिजे : आरती काणिरे
 

कोल्हापूर दि.१७ मार्च : महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे जीवन घडवले पाहिजे असे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आरती काणिरे  यांनी केले.           
     

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या ऑनलाईन एम.बी.ए.  युनिटच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त ‘महिला सक्षमीकरण ’ याविषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात त्या  बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी प्र.संचालक डॉ. के. बी. पाटील होते. यावेळी उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे, समन्वयक डॉ.सी.ए.बंडगर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होते. 
         

श्रीमती आरती काणिरे म्हणाल्या स्त्रियांचा प्रवास हा प्रत्येक वेळी त्यांच्या मनाप्रमाणे होईल असे नाही. ज्या पद्धतीने अडचणी येतील  त्या पद्धतीने त्या सोडविल्या पाहिजेत. प्रत्येक स्त्रीचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. स्त्रीने स्वत:मधील क्षमता ओळखल्या पाहिजेत. 'ती करू शकते तर तू का नाही' हे महिलांच्या जीवनाचे बोधवाक्य असले पाहिजे.
       

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामधून आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या श्रीमती आरती काणिरे  स्वतःचा जीवनप्रवास मांडत असताना म्हणाल्या की, महिलांची आजची व पूर्वीची स्थिती यात फरक आहे, कष्टाला पर्याय नाही. तसेच त्यांनी जीवनातील ध्येयाचे महत्व, स्व-अध्ययन, आव्हाने, तडजोड व स्त्रीच्या घरच्या जबाबदाऱ्या यावर आंतरक्रियात्मक स्वरूपात मार्गदर्शन केले.
     

अध्यक्ष डॉ. के. बी. पाटील म्हणाले, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र महिला शिक्षणात भरीव योगदान देत आहे व देत राहील. स्वतः अभ्यास करून आज विविध ठिकाणी महिला नोकरी करीत आहेत. त्यामध्ये त्यांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. 
       

यावेळी स्वागत व प्रास्ताविक श्रीमती सुप्रिया मोगले यांनी केले. पाहुण्याची ओळख श्रीमती प्रियांका सुर्वे यांनी करून दिली. सूत्रसंचालन  डॉ.नगिना माळी  यांनी केले. तर आभार डॉ.केतकी पोवार यांनी मानले.


महिलांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे जीवन घडवले पाहिजे : आरती काणिरे
Total Views: 24