बातम्या
महिलांनी उद्योग उभारण्यावर भर द्यावा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
By nisha patil - 1/20/2024 7:21:45 PM
Share This News:
महिलांनी उद्योग उभारण्यावर भर द्यावा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यासोबत सर्वच महिलांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता, आता पुढे येऊन लघुउद्योग उभारण्यावर भर द्यावा असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.
मंगळवार पेठेतील स्वामी विवेकानंद आश्रम येथे जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव होत्या.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई प्रेमला पंडितराव जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध स्पर्धा व खेळाचे आयोजन केले होते. यामधून महिलांचे निखळ मनोरंजन झाले.
महिलांची शक्ती जिथे एकत्र येत असते तेथे नेहमीच इतिहास घडत असतो. त्यामुळे महिला शक्ती नेहमी एकत्र येऊन संघटित झाली पाहिजे, यासाठी फाउंडेशन विविध वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रम करीत असल्याचे डॉ. दश्मिता जाधव यांनी सांगितले.
अनेक महिला स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाच्या शोधात आहेत. अशा अनेक महिलांसाठी जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे, असे मत डॉ. गीतांजली पाटील यांनी व्यक्त केले.
महिलांचा सन्मान करून, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन विविध उपक्रम राबवते. हे सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत असे मत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या अध्यक्ष अंजली पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी रचना दोशी, महेजबीन शेख, मेघा भांबुरे यांची भाषणे झाली. फाउंडेशनच्या सदस्या पूजा मांगुरे, कविता पाटील, अनिता चांदणे यांनी मनोगत व्यक्त केली. माजी नगरसेविका शोभा बोंद्रे, अश्विनी बारामती, पुनम हवालदार, वैशाली महाडिक, उज्वला चौगुले, अंजली जाधव, विद्या घोरपडे, मंगल खुडे, लीला धुमाळ, चंदा बेलेकर, भाग्यश्री पाटील, पूजा आरडे, स्वप्नाली जगोजे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महिलांनी उद्योग उभारण्यावर भर द्यावा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव
|