बातम्या
चारचाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थीतुन काढून टाकणार
By nisha patil - 4/2/2025 4:21:37 PM
Share This News:
चारचाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थीतुन काढून टाकणार
लाडकी बहिण योजनेतुन लाभार्थी महिलेच्या कुटुंबात कोणाकडेही चारचाकी आढळून आल्यास योजनेतून नाव काढले जाणार आहे. अंगणवाडी सेविका माध्यमातून घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्यात.
राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास कल्याण अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा संजय गांधी योजनेसारख्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. चारचाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसाव्यात.
या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आलं होत. पण यानंतरही लाभार्थी महिलांच्या वतीने माघार घेत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यास अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चारचाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थीतुन काढून टाकणार
|