बातम्या
चौगुले महाविद्यालयात महिला दिन साजरा
By nisha patil - 9/3/2024 11:46:31 AM
Share This News:
चौगुले महाविद्यालयात महिला दिन साजरा
सर्व क्षेत्रात महिलांचे कार्य उल्लेखनीय-डॉ. विजय पाटील
पन्हाळा - प्रतिनिधी आठ मार्च हा महिलांच्या हक्काचा दिवस आहे.महिलांच्या राजकीय, सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्याचा हा दिवस आहे.महिलांनी आपल्या हक्कासाठी जो लढा दिला त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो.आज महिलांनी विविध क्षेत्रात अतिउच्च कामगिरी केली आहे.असे एक पण क्षेत्र नाही जिथे महिला पोचलेल्या नाहीत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त "विविध क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांचे योगदान" या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ.विजयकुमार पाटील बोलत होते.
यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती महाराणी ताराबाई,सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी,प्रतिभाताई पाटील,लता मंगेशकर,किरण बेदी, सिंधुताई सपकाळ,फातिमा बीबी,पी.टी.उषा,अण्णा राजम मल्होत्रा,साक्षी मलिक,सानिया मिर्झा,हिना सिंधू,रीता फारिया, तेजस्विनी सावंत,मिताली राज,प्रिया झिंगन,अरुणिमा सिन्हा यांच्या विषयीची माहिती विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी मनिषा सावंत यांनी केले आभार कु.सायली तांबवेकर हिने मानले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.
चौगुले महाविद्यालयात महिला दिन साजरा
|