बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा
By nisha patil - 5/16/2024 12:13:52 PM
Share This News:
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारतीय शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या अमुलाग्र बदलांना सामोरे जाण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात प्रथम वर्षात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकरीता क्रेडिट कोर्स अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन हा विषय नव्याने प्रविष्ट केला आहे.
आपत्ती आणि आपत्तीच्या काळातील व्यवस्थापनाचे धडे देण्याकरिता महाविद्यालयातील आईक्यूएसी आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपत्ती काळात काम करणाऱ्या व्हाईट आर्मी यांचे मार्फत क्रेडिट कोर्स अंतर्गत सदरचा विषय सुरू केला आहे सदरच्या अभ्यासक्रमात आपत्ती आणि आपत्तीच्या काळातील प्रथमोपचार यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.
सदरच्या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ अमोल कोडोलीकर ऍस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर व डॉ. भींगार्डे यांचे हस्ते करण्यात आले . या कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थिती रुग्णांची हाताळणी आणि घ्यावयाची काळजी याकरिता प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणातील गतिमानता आपल्या महाविद्यालयात आणणारी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील ही पहिली संस्था आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले . सदरच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा पूल तज्ञ असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ संगीता पाटील आणि डॉ योगेश गवळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, महाविद्यालयातील आयक्युएसी प्रमुख डॉ श्रुती जोशी, समन्वयक डॉ सिद्धार्थ कट्टीमनी, एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन सुनीता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्रबंधक श्री आर. बी. जोग यांनी केले. या कार्यशाळेस विदयार्थी,विद्यार्थिनी हजर होत्या
विवेकानंद महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा
|