शैक्षणिक
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 1/25/2025 8:21:00 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर, दि. 25 :– विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील भूगोल विभागाने भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अभिजीत पाटील यांनी भौगोलिक माहिती प्रणालीचा समाज उपयोग आणि जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाच्या उपयोगाबद्दल मार्गदर्शन केले. एल निनो आणि ला निनो प्रवाहांवर चर्चा केली व उपग्रहांचा वापर यावर सुस्पष्ट माहिती दिली.
कार्यक्रमासाठी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये डॉ. गोवर्धन उबाळे यांनी प्रास्ताविक केले, डॉ. शुभांगी काळे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली, आणि डॉ. निशा सुर्वे यांनी आभार मानले.
विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर कार्यशाळा संपन्न
|