बातम्या

शहाजी महाविद्यालयात नवीन शिक्षण धोरणावर कार्यशाळा संपन्न

Workshop on New Education Policy concluded in Shahaji College


By nisha patil - 8/23/2023 11:10:36 PM
Share This News:



कोल्हापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य आधारित कोर्सेस सुरू करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आलेले आहेत. यामुळे यापुढे कौशल्याधारित विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरणामुळे तयार होतील असा विश्वास शिवाजी विद्यापीठातील कॉमर्स विभागाचे बीओएस चेअरमन डॉ. के. व्ही.मारुलकर यांनी केले. 
   

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील एम.कॉम.विभागाच्या वतीने एम.कॉम.विभागाचा बदललेला अभ्यासक्रम आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर एक दिवशी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  होते. 
   प्रारंभी रोपास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

 

डॉ. मारूलकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य आधारित कोर्सेस, मूल्यमापनात सातत्य आणि श्रेणी आधारित गुणांक पद्धती स्वीकारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती करावी लागेल. विद्यार्थ्यांनी अकॅडमीक बँक क्रेडिट चे अकाउंट काढणे बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 
   

शिवाजी विद्यापीठातील अकाउंटन्सी विभागाचे बीओएस चेअरमन डॉ. एन. एल. कदम म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार एम. कॉम. चा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाणिज्य  शाखेबरोबरच, बँकिंग क्षेत्रातील आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात होण्यास मदत होईल. यामध्ये रोजगाराभिमुख विद्यार्थी तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
   प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एम.कॉम.ची नवीन शिक्षण धोरणावरील  विद्यार्थ्यांसाठीची पहिलीच कार्यशाळा आहे .नवीन शिक्षण धोरणातील विविध बदलाचा,बदललेल्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
स्वागत व प्रास्ताविक एम. कॉम विभाग प्रमुख,या कार्यशाळेचे समन्वय डॉ. महादेव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सी. के. पाटील व प्रा. शरयू शेवडे यांनी केले. कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. प्रा. उज्वला पाटील यांनी आभार मानले. 
   या उपक्रमास संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले. 
या कार्यक्रमास प्रबंधक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ. सुनिता राठोड, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, , सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


शहाजी महाविद्यालयात नवीन शिक्षण धोरणावर कार्यशाळा संपन्न