शैक्षणिक

 शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त ५ मार्चला कार्यशाळेचे आयोजन

Workshop organized on March 5 on the occasion of Women


By nisha patil - 4/3/2025 5:16:27 PM
Share This News:



 शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त ५ मार्चला कार्यशाळेचे आयोजन

एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन....

 शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त ५ मार्चला सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या शाहू सिने सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलंय. 'महिलांचे उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे.

अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के असणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्र, 'बेटी बचाओ अभियान', श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समिती, लेडीज हॉस्टेल, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्र-कुलगुरू-प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी सुहासिनी पाटील मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. निशा मुंडे-पवार, आणि प्रा. डॉ. पी एम. चौगुले यांनी केलं आहे.


 शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त ५ मार्चला कार्यशाळेचे आयोजन
Total Views: 41