बातम्या

आज पासून वर्ल्ड कप 2023 सराव सामने

World Cup 2023 practice matches from today


By nisha patil - 9/29/2023 5:23:55 PM
Share This News:



विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत सराव सामन्यांच्या माध्यमातून सर्व संघ आजपासून या मेगा स्पर्धेची तयारी करतील. ICC ने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे, 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान एकूण 10 सराव सामने खेळवले जातील ज्यामध्ये प्रत्येक संघाला प्रत्येकी 2 सामने खेळण्याची संधी मिळेल.सराव सामन्यांसाठी गुवाहाटी, हैदराबाद आणि तिरुवनंतपुरम ही तीन ठिकाणे निवडण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी एकूण तीन सराव सामने होतील. बांगलादेश संघ गुवाहाटीमध्ये श्रीलंकेशी भिडणार आहे, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना तिरुअनंतपुरममध्ये आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ 30 सप्टेंबरला गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. हे सर्व सराव सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील. या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला आपल्या संघातील सर्व 15 खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी असेल.


आज पासून वर्ल्ड कप 2023 सराव सामने