बातम्या
सुरांच्या बादशहाला देणार विश्वविक्रमी मानवंदना: अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचा उपक्रम
By nisha patil - 7/20/2023 6:56:14 PM
Share This News:
सुरांच्या बादशहाला देणार विश्वविक्रमी मानवंदना: अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचा उपक्रम
भारतीय चित्रपट सृष्टीतील विख्यात गायक आणि सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांच्या यंदाच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील अश्वगोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन च्या वतीने विश्वविक्रमी मानवंदना देण्यात येणार आहे मोहम्मद रफी यांच्या 100 गीतांचा सलग रीले पद्धतीने शंभर गायकांकडून गाण्याचा अनोखा उपक्रम करण्यात येणार आहे येत्या 22 जुलैला शाहू स्मारक भवन मध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे आणि चेअरमन प्राध्यापक आनंद भोजने यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथे 31 जुलैला मोहम्मद रफी यांचा 42 वा स्मृतिदिन आहे आजही संगीत प्रेमींच्या मनावर मोहम्मद रफी यांच्या जादुई आवाजाची मोहिनी आहे. त्यामुळेच फाउंडेशनच्या वतीने त्यांना विश्वविक्रमी अभिवादन करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे या उपक्रमात मोहम्मद रफी यांची 100 गीते सलगपणे रिले पद्धतीने शंभर चाहते जाणार आहेत यासाठी कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून रफी प्रेमी गायक या उपक्रमात सहभागी होणार आहेत या विश्वविक्रमी उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईक नवरे यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेला फाउंडेशनचे चेअरमन प्राध्यापक आनंद भोजने,अमित जाधव विठ्ठल लोनुष्ठे, डॉक्टर कपिल राजहंस, डॉक्टर प्रवीण आवळे, डॉक्टर महेंद्र कानडे, सुनील कांबळे, प्रवीण बनसोडे आदींसह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
सुरांच्या बादशहाला देणार विश्वविक्रमी मानवंदना: अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनचा उपक्रम
|