बातम्या
शहाजी महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
By nisha patil - 6/21/2023 5:23:17 PM
Share This News:
कोल्हापूर :श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा झाला.यानिमित्त योगा वरती व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक स्तरावरी योगाचे काम करणाऱ्या आनंद मार्ग प्रचारक संघाचे प्रमुख आचार्य योगेश्वरानंद अवधूत यांनी योगाचे विविध अंग आणि महत्त्व या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले योग म्हणजे केवळ असणे नसून मन बुद्धी शरीरांचा योग्य मिलाप आहे. योगातून शांतता मिळते व मनाला समाधान प्राप्त होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण हे होते.
यावेळी प्रा. रणजीत पाटील यांनी योगाची असणे प्रात्यक्षिकासह करून दाखवली या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रा. डॉ.प्रशांत पाटील व क्रीडा शिक्षक प्रा.प्रशांत मोटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक मनीष भोसले व योग गुरु अजित साळुंखे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व विद्यार्थी व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले
शहाजी महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
|