बातम्या
विद्या प्रबोधिनी मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/15/2023 6:44:20 PM
Share This News:
विद्या प्रबोधिनी मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात संपन्न
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विद्या प्रबोधिनी व ज्योती कॉम्प्युटर सर्व्हिसेस कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्या प्रबोधिनी येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी युवक युवतींसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी उद्योजक राजेश तांबे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व पूर्वीपासून त्यामध्ये होत आलेले बदल याबाबत माहिती दिली.तसेच जिल्ह्यातील उद्योग व्यवसायामध्ये कशा प्रकारचे मनुष्यबळ लागते याबाबत मार्गदर्शन केले. नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरू करून नोकरी देणारे बना असा सल्ला त्यांनी उमेदवारांना दिला. तसेच "जितक्या लवकर कमवते व्हाल, तितक्या लवकर प्रगती साधाल" हा गुरुमंत्र त्यांनी उमेदवारांना दिला.खासदार धनंजय महाडिक यानी भारत हा सुरवातीला आयातदार देश होता तो सध्या कशाप्रकारे निर्यातदार देश बनत चालला आहे व त्यासाठी कौशल्य धारीत मनुष्यबळाची लागणारी गरज लक्षात घेवून युवक युवतींनी स्वतःला विकसित करण्याचा सल्ला उपस्थित उमेदवारांना दिला. यावेळी MAARG स्टार्ट अपचे सदस्य प्रा. हर्षवर्धन पंडित, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
विद्या प्रबोधिनी मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात संपन्न
|