बातम्या

आज ओढ्यावरील यल्लमा देवीची आंबील याञा..

Yallama Devi Ambeel on the stream today


By Administrator - 6/1/2024 1:55:18 PM
Share This News:



 कोल्हापुरातील ओढ्यावरच्या यल्लमाची आंबील यात्रा म्हणजे अवघ्या कोल्हापूरकरांच्या विरंगुळ्याचे आणि श्रद्धेचे ठिकाण . मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर यात्रा  जाऊन आली की येणाऱ्या लगेचच्या काही दिवसात विशेषता बुधवारी किंवा शनिवारी रेणुका देवीची आंबील यात्रा भरवण्याचा प्रघात आहे. ही यात्रा म्हणजे कोल्हापूरच्या शाकाहारी खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. एरवी कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा मिसळ भेळ असे पदार्थ डोळ्यापुढे उभे राहतात. बाहेर गावच्या लोकांच्या दृष्टीने कोल्हापूरकर जणू 24 तास याच पदार्थांवर जगतात पण असंही एक शाकाहारी जेवणाचं ताट कोल्हापूरकरांच्या अगदी आवडीचं असतं ते म्हणजे या यल्लमाच्या नैवेद्याचे ताट. ज्वारीची भाकरी, वरणं म्हणजे पावटा आणि वांग्याची एकत्र केलेली भाजी. मेथीची डाळ न घालता फक्त तेलावर परतून शिजवलेली भाजी. थापट वड्या अर्थात पाटवड्या, गाजर ,कांद्याची पात, लिंबू, केळ,वरण-भात दहीभात आणि त्यानंतर ताकाला बेसन किंवा ज्वारीचे पीठ लावून आलं लसणाची जाडसर भरड घालून फोडणी दिलेली आंबील हा या यात्रेचा महत्त्वाचा मेनू.


आज ओढ्यावरील यल्लमा देवीची आंबील याञा..