बातम्या
यशोदा पूल आपल्या सेवेसाठी नव्या दिमाखात सज्ज!
By nisha patil - 5/9/2024 8:33:04 PM
Share This News:
इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या महापुरामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती दूर करण्यासाठी, पाणी वाहते राहण्यासाठी आणि पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नांमुळे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे यशोदा पूलाचा शुभारंभ झाला आहे.
या उद्घाटन सोहळ्यात सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या शुभ हस्ते यशोदा पूलाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रमुख कार्यक्रमाला आमदार प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे आण्णा आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब प्रमुख उपस्थित होते. उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हा पूल आता नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार असून, या माध्यमातून त्यांनी महापुराच्या संकटांचा सामना करणे अधिक सोपे होईल.
यावेळी बाळासाहेब कलागते, राहुल घाट, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, नंदू पाटील, राजेंद्र बचाटे, चंद्रशेखर शहा, उर्मिला गायकवाड, शाहनाज मुजावर, महावीर कोल्हापुरे, कुलकर्णी काका, लेले काका, नरसिंग पारिक, शैलेश गोरे, संजय केंगार, प्रशांत कांबळे, किशोर पाटील, सागर कम्मे, प्रदीप दरीबे, शिवाजी काळे, अनिल बमन्नावर, बाबासाहेब पाटील, नागेश पाटील, प्रितम गुगळे, राजेंद्र देसाई, राजू दरीबे, रमेश पाटील, सचिन हेरवाडे, महादेव कांबळे, शशिकांत नेजे, विजय लवटे, मलकारी लवटे, चंद्रकांत इंगवले, तौफिक मुजावर, सर्जेराव पाटील, पांडुरंग सोलगे, एम.के.कांबळे, रमेश कबाडे, महावीर जैन, तानाजी कोकितकर, बाबू रुग्गे, रियाज गोलंदाज, बजरंग कुंभार, दादासो मगदूम, शांताप्पा मगदूम, कटके परिवार, राजू मुजावर, महेश परीट, गजानन नेर्लेकर, राजू चव्हाण, अवधूत परीट, रेवनाथ कदम, विष्णू कम्मे, गुंडू जोंग, विनायक म्हेत्रे, चावरे मामा, सिद्धाप्पा पाटील, विष्णू लवटे, गुंडू गोरे, पिंटू चव्हाण, प्रकाश पुजारी, दिलीप कुरणे, संपत जामदार, रोहन पाटील, राजू बोंद्रे, नितेश पोवार, सतीश मुळीक, इम्रान मकानदार, शशिकांत पाटील, अभिषेक पाटील, नजमा शेख, नंदा साळुंखे, सीमा कमते, सपना भिसे, अलका शेलार, सुवर्णा लाड, अंजुम मुल्ला, अनिता जाधव, अविनाश, किरण लंगोटे, गणेश बागडी, स्वप्नील आरेकर, संग्राम लोंढे, आशिष पाटील, असिफ मुजावर, सुहास बुबनाळे गावभाग परिसरातील शेतकरी नागरिक व महिला उपस्थित होते.
यशोदा पूल आपल्या सेवेसाठी नव्या दिमाखात सज्ज!
|