बातम्या
काल रस्ता केला आणि आज उकरला.. महापालिकेचा अजब कारभार .
By nisha patil - 12/28/2024 4:03:45 PM
Share This News:
तीस वर्षानंतर रस्ता झाला आणि बारा तासात खोदण्यात आला, असा महापराक्रम कोल्हापूर महानगरपालिका आणि ठेकेदाराने केल्याचं निदर्शनास आलंय.शाहूपुरी पहिल्या गल्लीतील रस्ता काल तब्बल 30 वर्षानंतर झाला होता.
तो आता बारा तासातच उखडण्यात आला आहे. याबाबत संबंधित ठेकेदारांना ड्रेनेज बांधकाम करण्यासाठी आम्ही हा उघडत असल्याचं म्हटलं आहे आणि रस्ता करणाऱ्या ठेकेदारांने आम्ही आमचे काम केलं असं म्हटलंय.
त्यामुळे स्थानिक नागरिकांचा आता पुन्हा या नाहक त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. आणि या माध्यमातून महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
काल रस्ता केला आणि आज उकरला.. महापालिकेचा अजब कारभार .
|