बातम्या

योग टिप्स : योग करताना या चुका करणे टाळा

Yoga Tips


By nisha patil - 6/1/2024 7:24:31 AM
Share This News:



स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळं काही करतो. सकस आणि पौष्टीक आहार घेतो. व्यायाम करतो. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो. योगासन देखील करतो. गेल्या काही वर्षांत लोकांना योगा बद्दलची  आवड वाढली असून काही लोक घरीच योगासन करतात. योगासन केल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही देखील योगासन घरी करत असाल तर योगासन करताना या चुका करणे टाळा.

लगेच पाणी पिऊ नये-
योगा करत असाल तर या काळात पाणी पिण्याचे लक्षात ठेवा. योगासने करत असताना शरीरातील उष्णतेची पातळी हळूहळू वाढते. अशा परिस्थितीत जर कोणी थंड पाण्याचे सेवन केले तर उष्णतेची पातळी झपाट्याने खाली येऊ शकते. तसेच, यामुळे ऍलर्जी, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योगा केल्यानंतर 15 मिनिटांनीच पाणी प्या.
 
घाई करू नये- 
योग करताना घाई करू नये. योगसाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. योगसाठी पूर्ण वेळ द्या. असं केल्यानेच योगा केल्याचा फायदा मिळतो. 
 
योगासन ठराविक वेळेत करा- 
योगासने करण्याची वेळ आहे. योग दुपारी किंवा रात्री करू नये. वास्तविक, ब्रह्म मुहूर्त हा योगासने करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो कारण यावेळी झोपल्यानंतर शरीराला आराम मिळतो आणि दुसरे म्हणजे पोटही हलके असते. त्यामुळे वेळेची काळजी घेतली पाहिजे.
 
योग करणे सोडू नका-
अनेकांना असं वाटते की आज योगा केला तर त्याचे फायदे लगेच मिळावे. पण योगासनांचा प्रभाव हळू-हळू आणि दीर्घकाळा पर्यंत असतो. म्हणून योगासन करणे एकाएकी बंद करू नका


योग टिप्स : योग करताना या चुका करणे टाळा