विशेष बातम्या

शरीर आणि मनासाठी योग!

Yoga for body and mind


By nisha patil - 6/15/2023 7:02:36 AM
Share This News:



योग ही आचार, विचार आणि कृतीप्रणवता या प्रत्येकाची साधना आहे. योग प्रत्येकाला स्वतःची काळजी घेण्याचे पहिले कर्त्यव्य शिकवतो. आमची संस्था संसारामध्ये राहून कर्तव्य पार पाडणाऱ्या प्रत्येकाला योग शिकवण्यासाठी प्रेरणा देते. पूर्वी पन्नाशी पार केलेले स्त्री- पुरुष योगसाधना शिकण्यासाठी यायचे. त्यातही महिलांचं प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतकं होतं. तेव्हा परदेशांतून येणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण मोठं होतं. सरकारने योगविषयाला प्राधान्यक्रम दिल्यामुळे पाच वर्षांमध्ये हे प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. शंभर वर्ष झालेल्या या संस्थेमध्ये आता आज चाळीस देशांचे लोक योगाभ्यास शिकण्यासाठी येथे येऊन राहतात. येथे प्रशिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेतून इतर देशांमध्येही विद्यार्थी घडवतात. हा प्रवास आता अधिक गतीने सुरू झाला आहे. पूर्वी तरुण पिढीचा या विषयाकडे वाढता कल नव्हता. आता मात्र या योग या विषयाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या तरुणांचं प्रमाणही वाढतं आहे. शारीरिक- मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे.योगसाधना ही शारीरिक मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी मदत करते. मात्र कोणताही योगशिक्षक व्याधींसाठी सुरू असलेले औषधोपचार बंद करा, असा सल्ला देत नाही. रक्तदाब असेल तर तो योगसाधनेमुळे नियंत्रणात येतो, काही काळानंतर त्यावर सुरू असलेली औषधे कमी करण्याचा सल्ला डॉक्टर स्वतःच देतात. योगसाधना हा विचार, जीवनशैली आहे, ती व्याधीनिवारणासाठी पूरक साधना आहे. औषधांची गरज ज्या ठिकाणी असते तिथे ती घ्यावी लागतात.


शरीर आणि मनासाठी योग!