बातम्या
‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
By nisha patil - 5/3/2024 9:32:36 AM
Share This News:
नियमित योगा केल्याने मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढते. झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रिया नियंत्रित राहते. तणावाला कारणीभूत हार्मोन कमी होतात. संशोधकांनी बारा आठवडे अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत. नैराश्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
हे आहेत परिणाम
१ यामुळे लक्षणीय विकृतीसह अन्य आजार उद्भवतात.
२ बालपणातील प्रतिकूल घटनाही नैराश्याला कारणीभूत ठरतात.
३ शरीराच्या सुरक्षणात्मक नियामक यंत्रणेत अडथळा होतो.
४ अनुवंशिक चक्र व पेशींच्या कार्याला हानी पोहचते.
५ तणावाचा प्रतिकार करणाऱ्या यंत्रणेलाच नैराश्य बाधित करते.
हे लक्षात ठेवा
१ नैराश्य ही प्रमुख आरोग्य समस्या आहे.
२ औषधोपचार व मानसोपचार हे नैराश्यावर गरजेचे आहेत.
३ योगाच्या माध्यमातून उपचार नैराश्य दूर होते.
‘योगा’मुळे कमी होते नैराश्याची तीव्रता, ‘हे’ आहेत ५ परिणाम
|