बातम्या
तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
By nisha patil - 12/26/2023 7:25:26 AM
Share This News:
भारतीय आहारात भात हा खूप महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण म्हणजे भाताचे वेगवेगळे पदार्थ आपण जेवणात खातो किंवा तांदळापासून बनवण्यात आलेले पदार्थ आपण खात असतो.
त्यात सगळ्यात जास्त लोकप्रिय पदार्थ जे आहेत ते म्हणजे भातापासून बनवण्यात आलेल्या रेसिपी. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की भात शिजवण्याची देखील एक पद्धत असते. त्याच पद्धतीनं भात शिजवला तर तुम्हाला जे आवश्यक गुणधर्म आहेत ते नक्कीच मिळतील.
सगळ्यात सामान्य पद्धत म्हणजे अधिक लोक हे भात शिजवण्यासाठी सगळ्यात पहिलं प्राधान्य हे प्रेशर कूकरला देतात. दुसरीकडे काही लोक हे भाताला वाफवतात किंवा उकळवतात. या तिनही पद्धत असताना सगळ्यात योग्य पद्धत कोणती? हा प्रश्न आता तुम्हालाही पडला आहे का?
प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात चवीला चांगला लागतो. पण आपल्या आरोग्यासाठी वाफवलेला भात फायदेकारक असतो, असे म्हटले जाते. वाफवलेल्या भातातून स्टार्च काढून टाकण्यात येतो. त्यामुळे चरबी कमी होते आणि तुमचं वजन वाढत नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते, स्टार्चसह वाफवलेले तांदूळ पाण्यात विरघळणारे पोषक कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील काढून टाकतात.
प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात आरोग्यासाठी फायदेकारक
जेव्हा प्रेशर कुकरमध्ये तांदुळ शिजवला जातो तेव्हा उच्च दाब आणि उष्णतेमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. वाफवलेला तांदूळ किंवा उकडलेल्या तांदळातून इतर पद्धतींनी तुम्हाला इतके फायदे मिळत नाहीत, जितके फायदे तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या तांदूळातून मिळतात. कारण हा पौष्टिकतेने भरपूर असतो आणि पचनासाठीही चांगला असतो.
प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या तांदुळात प्रथिने, स्टार्च आणि फायबर यांसारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे गुणधर्म आणखी वाढतात. असा भात तुम्हाला अनेक पौष्टिक फायदे देईल. त्याचवेळी, अनेक प्रकारचे जीवाणू आणि बुरशी नष्ट करण्यास देखील मदत करते. मात्र, वाफवलेलं किंवा उकडलेला तांदूळ शिजवण्याची पद्धतीतून असं काही मिळत नाही.
त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. जर तुम्ही इतर कोणत्याही प्रकारे भात शिजवलात तर तुम्हाला फारसा फायदा मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे भात शिजवल्याने तुमचा वेळही वाचतो.
तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
|