बातम्या
कमी वेळातही करू शकता परिणामकारक वर्कआऊट
By nisha patil - 2/27/2024 7:30:43 AM
Share This News:
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक असतो. अशावेळी अगदी कमी वेळात, पण शरीराला उपयुक्त ठरणारा व्यायाम आपण करू शकतो. उंच उडी मारून खुर्चीवर बसल्यासारखे करावे, पण प्रत्यक्षात बसू नये. यामुळे मांड्यांची ताकद वाढते. हे १० वेळा करावे. यामुळे कंबरेवरील आणि नितंबावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
ताठ उभे राहून हात वर करून सगळे शरीर ताणून घ्यावे. कंबरेतून पुढे वाकत हात जमिनीला टेकवावेत. पाय सरळ ठेवावेत व हाताच्या साह्याने पुढे चालत जावे. शरीर एका सरळ रेषेत येईल असे थांबावे. कंबर खाली किंवा वर करू नका. पुन्हा हाताच्या साह्याने मागे यावे. यामुळे खांद्याचा आणि पोटाचा चांगला व्यायाम होतो. उडी मारून दोन्ही हात आणि पाय बाजूला घ्यावेत आणि पुन्हा जवळ घ्यावे. असे २० वेळा करावे. याचा संपूर्ण शरीरासाठी फायदा होतो. पाठीवर झोपून दोन्ही पाय ९० अंशाच्या कोनात वर उचलावेत. त्यामुळे हृदयाला सुरळीतपणे रक्तपुरवठा होतो. यानंतर दोन्ही पायातील अंतर वाढवावे. श्वास घेत दोन्ही पायांना ताण येईल असे १० वेळा करावे. व्ही आकार करावा. कंबरेचा काही त्रास असल्यास हात कंबरेखाली धरावेत. जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत दोन्ही हात पाठीमागे नेऊन हाताच्या तळव्यांनी मानेला आधार द्यावा. पाय व्ही आकारात ठेवावेत. पोटावर ताण जाणवेल असे जास्तीत जास्त वेळ थांबावे व पुढे १० आकडे मोजून थांबावे.
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उत्तम आरोग्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक असतो. अशावेळी अगदी कमी वेळात, पण शरीराला उपयुक्त ठरणारा व्यायाम आपण करू शकतो. उंच उडी मारून खुर्चीवर बसल्यासारखे करावे, पण प्रत्यक्षात बसू नये. यामुळे मांड्यांची ताकद वाढते. हे १० वेळा करावे. यामुळे कंबरेवरील आणि नितंबावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

|