बातम्या
न वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
By nisha patil - 2/10/2023 7:54:01 AM
Share This News:
सध्या आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून सध्या आपली जीवनशैली ही अत्यंत बदलते आहे. आपल्याला विविध प्रकारे काळजी घ्यावी लागते.
बदलती जीवनशैली ही आपल्यासमोर हे फारच मोठे आव्हान झालं आहे. त्यामुळे सध्या आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणे हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का की तुम्ही काही भाज्या या शिजवताही खाऊ शकता. तुम्ही म्हणाल की नक्की अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला अधिकच तंदुरूस्त बनवतात. रोज आपण आपल्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात खासकरून विविध भाज्या खातो. खासकरून आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फारच पौष्टिक भाज्या खाण्यावर भर देतो त्यामुळे आपल्या जेवणात आपण रोज नवं काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना भाज्यांचे सॅलेडही खायला आवडते. त्यातून वाफवूनही भाज्या खाल्ल्या जातात.
आपण फळभाज्या या नुसत्याही खाऊ शकतो किंवा त्याचे सॅलॅड बनवूनही खाऊ शकतो. त्यामुळे अशावेळी आपल्याला यातून विविध प्रकारचे फायदे होताना दिसतात. त्यातून या फळभांज्यांचे आपण ज्यूसही पिऊ शकतो. त्याचे आपल्याला नानाविध फायदे होताना दिसतात. परंतु अशाही काही हेल्थी भाज्या आहेत ज्या तुम्ही न शिजवताही खाऊ शकता त्याचा तुम्हाला फार चांगला फायदा होतो. आरोग्याच्या दृष्टीनं तुम्हाला याचा फार चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येतो. चला तर मग पाहुया की भाज्यांची नावं काय आहेत. या भाज्या सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आपल्या रोजच्या रोज अगदी आरामात होऊ शकतो.
सध्या वजन वाढणे ही एक फारच मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अशावेळी आपल्याला चिंता असते ती म्हणजे वजन कमी कसे करावे. त्यातून विविध रोग होण्याची फार चिंता असते.
अशावेळी बाहेरचं खाणं हे आपण टाळणं अत्यंत महत्त्वाचं असते. त्यातून आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हेल्थी भाज्या खाऊ शकतो. तुम्ही कच्चा कॉबी खाऊ शकता कारण यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि त्यातून याद्वारे कर्करोगाचाही धोका टळतो. कांदा तर तुम्ही कधीही शिजवल्याशिवायही खाऊ शकता. त्याचसोबत ओलं खोबरंही खाऊ शकता. याचे आपल्या शरीराला खूप चांगले फायदे होतात. सुका मेवा तुम्ही कधीही कुठेही खाऊ शकता. कच्ची ब्रोकोलीही तुम्ही खाऊ शकता त्याचे अनेक फायदे आहेत. हल्ली ब्रोकोलीही सहज बाजारात उपलब्ध असते.
न वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
|