बातम्या
हळद नेहमी खात असाल, पण तिचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील!.
By nisha patil - 1/19/2024 7:28:30 AM
Share This News:
हळद अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय मानली जाते. हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देते असे नाहीतर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हळद तुम्हाला कॅन्सर, हृदयरोग, डायरिया, काविळ आणि सर्दी खोकला या आजारांपासून सुटका मिळवण्यातही फायदेशीर आहे.
चला जाणून घेऊया हळदीचे आरोग्यदायी फायदे...
1) अल्झायमरपासून बचाव
अल्झायमर डिमेन्शिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात पेशंटची स्मरणशक्ती, विचार क्षमता, वागण्याची पद्धत, आकलन, व्यक्तिमत्त्व आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती जाणून घेण्याची क्षमता लोप पावत जाते.
एन्नल ऑफ दी इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळद अल्झायमर रोखण्यासाठी आणि त्याच्यावरील उपचारासाठी फायद्याची आहे. हळदीमध्ये डायफरयूलॉयमेंथन तत्व असतात.
2) कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर
जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमध्ये कीमो-प्रोटेक्टिव गुण असतात आणि हे गुण तुम्हाला कोलोन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, टी सेल ल्यूकेमिया, रेडिएशन ट्यूमर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून सुटका मिळवण्यात मदत करतं.
3) डायबिटीज
हळदीमध्ये करकुमीन असतात. जे इन्सुलीन लेव्हल कंट्रोल करण्यात आणि डायबिटीजच्या औषधांचा प्रभाव वाढवण्यातही फायदेशीर असते.
4) लिव्हर
हळद खासकरुन दारू प्यायल्याने होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते. जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, हळदीमुळे लीव्हरवर कोलेस्ट्रॉलचा होणारा नुकसानदायक प्रभाव कमी केला जातो.
5) कोलेस्ट्रॉल
जर्नल ऑफ न्युट्रीशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, नियमीतपणे हळदीचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतात.
6) गॅस आणि पोटदुखी
हळद पावडर गाळून ते पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास पोटदुखणे, पोट फुगणे यापासून आराम मिळतो.
7) जखमा भरण्यासाठी
हळदीमध्ये फेनोलिक तत्व असतात, ज्यामुळे हळद जखमेवर लावल्यास जखम लगेच भरते. त्यासोबतच हळदीतील गुणकारी तत्वांमुळे इन्फेक्शन होत नाही.
8) सर्दी-खोकला
हळदीतील काही खास गुणांमुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुमच्या घशात खवखव असेल तर दूधात हळद मिश्रीत करुन घ्या.
हळद नेहमी खात असाल, पण तिचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील!.
|