बातम्या

कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या

You will be amazed to read these 7 health benefits of camphor


By nisha patil - 1/3/2024 7:42:02 AM
Share This News:



कापूरचा वापर हा पूजेसाठी मोठ्याप्रमाणात केला जातो. परंतु, तुम्हाला माहित आहे का याचा वापर औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक औषधांमध्ये कापूर असतो. याचा वापर करून अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात. याचे तेलही खूप फायदेशीर आहे. कापूराचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे
1 केसातील कोंडा दूर होतो. खोबरेल तेलात कापूर मिश्रित करुन याने केसांची मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.

2 टाचांना भेगा असल्यास कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा.3 दातांमध्ये वेदना होत असतील तर त्या जागेवर कापूर पावडर लावा.

4 खोबरेल तेलात कापूर टाकून चांगले मिश्रण तयार करा. याचा वापर खाज झालेल्या जागेवर करा.

5 इन्फेक्शन झाले असल्यास ती जागा कापराने स्वच्छ करा. कापराच्या धुराने इन्फेक्शन दूर होऊ शकते.

6 जखम किंवा कापलेले असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा.

7 एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा.


कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या