बातम्या
बनावट नोटा विकायला आलेला तरुण गजाआड
By nisha patil - 6/24/2023 4:50:39 PM
Share This News:
कांदिवलीच्या जनकल्याण नगरात राहणारा उमेश कुमार (32) असे बनावट नोटांसह पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. मालवणीच्या गणेश मंदिर परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सपोनि हसन मुलाणी यांना खबऱयाकडून मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक शेळके व हसन मुलाणी यांच्या पथकाने साध्या वेशात त्या ठिकाणी सापळा लावला.
खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती हातात प्लॅस्टिकची काळय़ा रंगाची पिशवी घेऊन तसेच एक लहान मुलास सोबत घेऊन सदर ठिकाणी येऊन थांबला. ती व्यक्ती संशयास्पद हालचाल करू लागल्याने पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या आठ बनावट नोटा तसेच तीन हजारांची रोकड मिळून आली. त्याच्या घराची झडती घेतली असता लॅपटॉप, ऍपल कंपनीचा आयपॅड, दोन पेनड्राईव्ह, चार मोबाईल, कोरे बॉण्डपेपर रिम, मायक्रो मेमरी कार्ड, त्यांच्या राहत्या घराच्या बिल्डिंग पार्किंगमध्ये त्यांच्या ताब्यातील महिंद्रा एक्सयूव्ही 500 असा 7 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी हा हरयाणाच्या बल्लबगढ येथील रहिवासी आहे
बनावट नोटा विकायला आलेला तरुण गजाआड
|